अजूनही .....
अजूनही संध्याकाळ तशीच रेंगाळते
आणि नाही म्हटलं तरी तुझी आठवण निघते
अजूनही त्या मोगऱ्याचा गंध दरवळतो
पण ती फुलं आता कुठंच दिसत नाहीत
अजूनही मी तसाच पावसात भिजायला जातो
पण आता अंग ओलं होऊनही मी कोरडाच राहतो
अजूनही रात्री वारा खिडकीशी फेऱ्या मारतो
पण आता त्यात ती शीतलता जाणवत नाही
अजूनही मी देवाकडे तेच मागणं मागतो
पण आता मनासारखा कौल मिळत नाही.
अजूनही मी तुझीच स्वप्नं पाहतो
पण आता त्यात मला मीच दिसत नाही
Labels: कविता


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home